Government of Maharashtra’s

ISMAIL YUSUF COLLEGE

of Arts, Science & Commerce

Image

Marathi

Image

About

मराठी भाषा आणि साहित्य विभाग

परिचय (Introduction) :

इस्माईल युसूफ महाविद्यालयाची स्थापना ..१९३० मध्ये झाली. या महाविद्यालयात स्थापनेपासूनच जोगेश्वरी आणि मुंबई महानगरातील सर्व आर्थिक स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच अनेक विषयांचे विभागही सुरु झाले. त्यातीलच एक मराठी विभाग. हा विभाग सुरुवातीपासूनच अतिशय समृद्ध असा वाङ्मयाभिरुची निर्माण करण्यात अग्रेसर राहिलेला विभाग आहे. या विभागात विभाग प्रमुख म्हणून प्रा.म.वा.तथा मधुकर वासुदेव धोंड, डॉ. विजया राजाध्यक्ष, प्रा. शंकर वैद्य, डॉ. विलास खोले, डॉ. सुरेखा सबनीस इत्यादी प्रतिभावंत साहित्यिक, अभ्यासकांनी विभागप्रमुख म्हणून कार्य केले आहे.अशा अनेक ज्ञात-अज्ञात मराठीच्या प्राध्यापकांनी महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच मराठी विभागाची पायाभरणी मजबूत केली. मराठी विभागातील अनेक माजी विद्यार्थी प्रतिभावंत साहित्यिक, अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षक, अभिनेते म्हणून कार्यरत आहेत.       

         राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग अशा महत्त्वपूर्ण विद्यार्थी अभ्यासपूरक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी विभाग कायमच समाजाशी बांधला गेला आहे. मराठी विभाग महविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी सातत्याने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, परिसंवाद, कार्यशाळा, संकेत संपर्क सत्र (वेबिनार) अशा विविध वाङ्मयीन उपक्रमाचे आयोजन करीत आहे. वाङ्मयाच्या अभिरुचीपासून ते आजच्या स्पर्धायुक्त गतिमान कालखंडात विद्यार्थ्यांच्या हितासाठी विभाग कटिबद्ध आहे.

स्थापना….(Establishment)
 महाराष्ट्र शासन इस्माईल युसूफ महाविद्यालयातील  मराठी भाषा आणि साहित्य विभागाची सुरुवात  ..१९३० मध्ये झालेली आहे.

मिशन(Mission)
१ मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान जागृत करणे.

.विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास  सुप्त गुणांचा शोध घेणे.
.विद्यार्थ्यांतील साहित्य विषयक जाणिवा    संशोधन दृष्टीचा विकास घडवून आणणे.

.विद्यार्थ्यांमधील भाषिक आणि वाङ्‌मयीन कौशल्ये विकसित करणे.

.विद्यार्थ्यांमधील साहित्यविषयक जाण आणि अभिरुची वृद्धिंगत करणे.

. मराठी भाषा आणि साहित्य अध्ययन-अध्यापनाद्वारे मानवी, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा अभ्यास करणे.

७.राष्ट्र उभारणीसाठी संवेदनशीलसुसंस्कृत आणि ध्येयवादी पिढी निर्माण करणे.

दृष्टी...(Vision)
.भाषा आणि साहित्याचे अध्ययन

.भाषा आणि साहित्य संशोधनाला प्रोत्साहन

.भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्ये, साहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे.

.मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेबद्दल जागरूकता निर्माण करणे.

Vision

दृष्टी(Vision)
भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्येसाहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे.


Mission

मिशन(Mission)
विद्यार्थ्यांमधील भाषिक आणि वाङ्‌मयीन कौशल्ये विकसित करणे.

Goal

ध्येय(Goal)
मराठी भाषा आणि साहित्य अध्ययन-अध्यापनाद्वारे मानवी, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा अभ्यास करणे.

Image